Thursday, June 11, 2009

I am adding this blog with intention to bring forward the poetry of Kavi Bhooshan – a contemporary poet of Chhatrapati Shivaji Maharaj.

Monday, April 6, 2009

Kavi Bhooshan - Introduction

देसन देसन ते गुनी आवत जॉंचन ताही।
तिनमें आयो एक कवी भूषन कहियतु जाही॥
दुज कन्नोज कुल कस्यपी रतनाकर सुत धीर।
बसत त्रिविक्रमपुर सदा तरनी तनुजा तीर ॥
बीर बीरबर से जहॉं उपजे कबि और भूप।
देव बिहारीस्वर जहॉं बिस्वेस्वर तद्रूप ॥

कवी भूषण, शि्वभूषण ह्या आपल्या अलंकारशास्त्रावरच्या ग्रंथात स्वत:ची ओळख करून देण्य़ासाठी वरील तीन दोहे लिहि्तो.
तो महाराजांना म्हणतोय - देशोदेशीचे गु्णी,कलाकार,कवी हे तुमच्याकडे याचना करण्यासाठी येतात. त्यातच हा एक कवी आला आहे - ज्याला भूषण ह्या नावाने ओळखतात. मी कश्यप गोत्रीय कन्नौजी ब्राह्मण, रत्नाकर (रत्नाकर त्रिपाठी) ह्यांचा पुत्र, जो कालिंदी - म्हणजेच यमुनेच्या तीरावर वसलेल्या त्रिविक्रमपूरचा आहे. हे त्रिविक्रमपू्र म्हणजे बिरबलाचं जन्मगाव. आणि बिहारीश्वराच्या रूपात सा्क्षात शंकर भगवान इथे वसलेले आहेत.

पुढे एका छंदात भूषण अप्रत्यक्षपणे स्वत:ची एक महत्त्वाची ओळख सांगतात -
ते म्हणताहेत - मी शिवभक्त आहे, मझ्या मनाला शिवाच्या भक्तीने जिंकून घेतलं आहे. परंतु शिवाची भक्ती ही साधुजनांच्या सेवेशिवाय प्राप्त होत नाही. साधुजनांच्या भौतिक अस्तित्त्वालाही काळाच्या मर्यादा असतात. आणि आज-काल कोणावर काळ कधी ओढावावा हे बलदंड योद्धे ठरवतात. असे असंख्य बलदंड योद्धे देशातल्या वेग-वेगळ्या ५२ रा्जांच्या पदरी नोकरीला आहेत. ह्या ५२ राजांना बादशाह औरंगजेबाने आपल्या पंजाखाली दाबून ठेवलं आहे, आणि तो पातशाह औरंगजेब - हे शिवाजीराजा - तुला घाबरतो ! म्हणून मी तुझं चरित्र गातो, तुझं गुणगान करतो !!

मन कवि भूषणको सिव की भगति जीत्यो
सिव की भगति जीत्यो साधुजन सेवा ने।
साधुजन जीते या कठिन कलि काल
कलि काल महावीर महाराज महि मेवा ने।
जगतमे जीते महावीर महाराजन ते
महाराज बावनहु पातसाह लेवा ने।
पातसाह बावनु दिलीके पातसाह जीती
दिलीपती हिंदुपती पातसाह सेवा ने ॥